कोल्हापूर : पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांनो सावधान...

मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चोऱ्यांचे वाढते प्रकार
बस स्थानक
बस स्थानक sakal
Updated on

कोल्हापूर : दिवाळी सुटीत गावी अगर पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांनो सावधान...अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात काही दिवसांत चोरट्यांनी दाखवलेली झलक हे त्यामागचे कारण आहे.

पुणे, मुंबई अशा महानगरात नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले हजारो लोक दिवाळी सुटीसाठी गावी येत-जात असतात. सुटीत अनेक जण पर्यटनासाठी जातात. त्यामुळे या काळात दरवर्षी मध्यवर्ती बस स्थानकात गर्दी असते. हीच संधी साधत चोरटे सक्रिय होतात. दरवर्षी या काळात या प्रवाशांच्या किमती ऐवजावर डल्ला मारण्याचे प्रकार घडतात. बस पकडण्याच्या घाईत असणाऱ्या प्रवाशांच्या दागिन्यांवर चोरटे प्रामुख्याने डल्ला मारतात. गेल्या पंधरा दिवसांत या परिसरात चोरट्यांनी आपले प्रताप दाखवले.

बस स्थानक
कोल्हापूर : 'ते' आश्वासन स्वार्थापोटी

असळज येथील प्रवासी मध्यरात्री बसच्या प्रतीक्षेत असताना त्याच्या खिशातील रोकड आणि मोबाईल संच चोरट्याने पळविला. नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तीची चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. दरम्यान, ठाण्याहून गावी जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कुटुंबातील महिलेच्या पर्समधील साडेनऊ तोळ्यांच्या दागिन्यासह पावणे तीन लाखांचा ऐवज चोरट्याने पळविला. एकापाठोपाठ घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

प्रवाशांना हे अपेक्षित...

  • परिसरात सीसीटीव्हीचे जाळे वाढवा

  • ठराविक काळासाठी पोलिसांची गस्त वाढवा

  • दक्ष राहण्याचे प्रबोधनात्मक फलक वाढवा

  • रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हलचालीवर लक्ष द्या

  • तक्रारींची तातडीने दखल घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Zilla Parishad teacher promotion controversy
Great Indian Bustard sighting in Kolhapur
Social media weather prediction vs IMD
Kolhapur Cooperative Politics Latest Update
Marathi News Esakal
www.esakal.com