
Mahadevi Elephant Return
esakal
संयुक्त प्रस्तावाचा आदेश :
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत न्यायमूर्ती वर्मा यांनी नांदणी मठ, वनतारा व महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मिळून महादेवी हत्तीला कोल्हापूरात आणण्यासाठी संयुक्त प्रस्ताव (जॉइंट प्रपोजल) दाखल करण्याचे आदेश दिले.
वनतारा व मठाचे मुद्दे :
वनताराने मठाने दाखवलेली जागा प्रत्यक्ष पाहिली असून त्याचे डिझाइन तयार असल्याचे सांगितले; मठाने सहा एकर जागेत हत्तीला आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.
न्यायमूर्तींची भूमिका :
महादेवी हत्तीची तब्येत सुरक्षित असावी, संगोपनासाठी कमिटी स्थापन करणार, तसेच ‘तांत्रिक/आर्टिफिशियल’ हत्ती तिच्या जागी ठेवू शकत नाही असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.
Madhuri or Mahadevi Elephant News : महादेवी हत्तीला कोल्हापूर येथील नांदणी मठात आणण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. न्यायमूर्ती वर्मा यांनी मठ, वनतारा आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्त प्रस्ताव (जॉइंट प्रपोजल) दाखल करण्याचे आदेश दिले. मठाकडून या प्रस्तावासाठी एक आठवड्याचा अवधी मागण्यात आला असून हाय पॉवर कमिटी या प्रकरणात सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले.