
कोल्हापूर सीबीएसवर एसटी नसल्याने प्रवासी संतापले...
esakal
ST Buses Raise : तीन तासांहून अधिक काळ वाट पाहूनदेखील एसटी उपलब्ध झाली नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे जाणारे प्रवासी आज संतापले. त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकामधील (सीबीएस स्टँड) रस्त्यावरच ठिय्या मारला. या स्थानकाच्या प्रवेशद्वारामध्ये रास्ता रोको करत एसटी प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.