
मदत करतो म्हणाला अन् अवघ्या पाच मिनिटांत प्रकाशकाला दोन लाखांना लुटलं
esakal
तीन ठळक मुद्दे (Highlights):
एसटी प्रवासात रोकड लुट: कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बसस्थानक ते दाभोळकर कॉर्नर या फक्त पाच मिनिटांच्या प्रवासात प्रवाशाची बॅग उघडून भामट्याने १ लाख ७६ हजारांची रोकड लुटली.
धार्मिक पुस्तक प्रकाशक ठरले बळी: गणेश कडुबा साळवे (वय ५४) हे धार्मिक पुस्तक प्रकाशक असून, विक्रीची रक्कम घेऊन पुण्याकडे जात असताना हा प्रकार घडला.
पोलिसांचा तपास सुरू: शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
CBS Stand Robbery : मध्यवर्ती बसस्थानक ते दाभोलकर कॉर्नर चौक या पाचच मिनिटा'च्या एसटी प्रवासात प्रवाशाची बॅग उघडून भामट्याने आज एक लाख ७६ हजारांची रोकड लुटली. पुस्तक प्रकाशक गणेश कडुबा साळवे (वय ५४, रा. मिलिंदनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मदतीच्या बहाण्याने बाजूलाच बसलेल्या भामट्याने हा प्रकार केल्याचा संशय असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.