

Maharashtra government job fraud case
esakal
Kolhapur Crime News : मुंबईमध्ये पोलिस अधिकारी असल्याचे सांगून महसूल विभागात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून साडेपंधरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीला अटक करण्यात आली. समीर दगडू पाटील (वय ४९ ) आणि त्याची पत्नी सुचिता म्हैसाने (वय ४३, रा. फ्लॅट नं. ४०४, केएमसी पार्क, वीर सावरकर मार्ग, गणेश मंदिरजवळ विरार, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.