Kolhapur Circuit Bench : कोल्हापूर सर्किट बेंचबाबत महत्त्वाची बातमी! शेंडा पार्कमध्ये 75 एकर जागा निश्चित, लवकरच 495 नव्या पदांची घोषणा; प्रभारी मुख्य न्यायमूर्तींचे मोठे विधान

75 acres land for Kolhapur Circuit Bench : कोल्हापूर सर्किट बेंचच्या विस्तारासाठी शेंडा पार्क येथे 75 एकर जागा मिळाली असून 495 नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत. पुढील दहा वर्षांत कोल्हापूरचा कायापालट होईल, असे रवींद्र घुगे म्हणाले.
Ravindra Ghuge Kolhapur Circuit Bench announcement

Ravindra Ghuge Kolhapur Circuit Bench announcement

esakal

Updated on

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे काम वेगाने प्रगती करीत आहे. जुलैमध्ये शेंडा पार्क येथील जागेची पाहणी करून एकूण ७५ एकर जागा मिळण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले. खंडपीठसाठी ४९५ नवीन पदे निर्माण केली जात असून याचीही लवकरच घोषणा होईल, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिली. येत्या दहा वर्षांत कोल्हापूरचा कायापालट होईल, अशा शुभेच्छाही दिल्या. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्‍त सभागृहात झालेल्या सर्किट बेंच वर्षपूर्ती सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com