Kolhapur : शहरातील सहा मटका अड्ड्यांवर छापे ; ३४ संशयितांवर कारवाई

३४ संशयितांवर कारवाई; दोन लाखांचे साहित्य जप्त
जुगार अड्डा
जुगार अड्डा sakal

कोल्हापूर : शहरातील सहा ठिकाणी मटका अड्ड्यांवर छापे टाकून मालक वैभव विजय पाटील, आयुब खुदबुद्दीन जमादार, किरण कवाळे, राजू जाधव या मटका बुकीच्या मालकांसह एकूण ३४ संशयितांवर कारवाई करण्यात आली.

यात २५ जणांना ताब्यात घेतले. ८४ हजार ५२० रुपये रोख, १९ मोबाईल हॅण्डसेट, तीन मोटारसायकली असे एकूण दोन लाख १५ हजार ७०० रुपयांचे साहित्य जप्त केले. कारवाईत ३४ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हे नोंद केले असून, त्यापैकी २५ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.

कारवाई केलेली ठिकाणे अशी ः न्यू शाहूपुरी येथील सलून दुकान, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नरजवळ अक्षय महेश केसरकर याच्या घरी, शाहूनगर येथील सीताराम रामभाऊ कुराडे याच्या घरी, उमा टॉकीज चौकाजवळील संदीप भालचंद्र पवार याच्या घरी, क्लासिक परमिट रूमशेजारील रोडवर, तीन बत्ती जाणाऱ्या रोडवर ओकार अपार्टमेंटसमोर अशा सहा ठिकाणी अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

संशयित आरोपी असे ः नारायण लक्ष्मण कारीडकर (रा. शाहपुरी), मोहन मधुकर दाभाडे (मातंग वसाहत, राजारामपुरी) आयुब खुदबुद्दीन जमादार (कोल्हापूर), अक्षय केसरकर (फोर्ड कॉर्नरजवळ, लक्ष्मीपुरी), धनाजी बळवंत यादव (शनिवार पेठ), रामा दगडू तेली (राजेंद्रनगर), अविनाश देवाप्पा माळी

(मझरेवाडी रोड, कुरुंदवाड), भरत लक्ष्मण भवड (रा. बालेवाडी ता. पन्हाळा), महादेव शंकर माने (घोरपडे गल्ली, शाहुपूरी), राजेंद्र शंकर भंडारी (ताराबाई पार्क), राजू जाधव (लक्ष्मीपुरी), अनिल वसंतराव घाटगे (रा. दत्त गल्ली, राजारामपुरी), मुबारक अपालाल नदाफ (रा. यादवनगर), किरण आवळे (मातंग वसाहत, राजारामपुरी),

सीताराम रामभाऊ कुराडे (शाहूनगर), अक्षय लोखंडे (मातंग वसाहत, राजारामपुरी), बजरंग चिन्नाप्पा साळोखे (शाहूनगर), वैभव पाटील,(देवकर पाणंद), जयानंद महादेव हिरेमठ (रा.बेळगाव), धैर्यशील आनंदा सुळेकर (रा. सुळे, ता. पन्हाळा), सदानंद निशिकांत चोपदार (कसबा बावडा), स्वप्नील भगवान पाटील (सोमवार पेठ), जयदीप शशिकांत साळुखे (रविवार पेठ), सचिन मोहन हावळ

(साठमारी जवळ मंगळवारपेठ), ओम संजय चव्हाण (जागृतीनगर), संदीप भालचंद्र पवार (जरगनगर), धीरज नरेश राव (शिवाजी उद्यमनगर), कृष्णात बंडा कांबळे (व्हन्नूर, ता. कागल), सुशांत तानाजी पाटील (लक्ष्मीपुरी), अविनाश सुनील भाट आणि कुणाल सुरेश शेळके ( रा. १४ वी, गल्ली राजारामपुरी), रामू तिमन्ना पवार (दौलतनगर), सिकंदर बाबुलाल मोमीन (दौलतनगर).

जागा भाड्याने देण्यापूर्वी खात्री करा

अवैध व्यवसायासाठी खुली जागा, दुकान गाळा, घर भाड्याने दिल्यास मालकांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे मालकांनी जागा भाड्याने देण्यापूर्वी याबाबतची खात्री करावी, असेही आवाहन निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले आहे.

जुगार अड्डा
Kolhapur News : मंजूर गाड्याही सुरू नाहीत; खासदारांकडून पाठपुराव्याची अपेक्षा

मटका -जुगाराचे मूळ मालक

वैभव पाटील, आयुब जमादार, किरण कवाळे, राजू जाधव अशी मटका जुगाराच्या मालकांची नावे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्यांच्यावरही गुन्हे नोंदविण्यात आले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात एक, राजारामपुरी दोन, राजवाडा दोन आणि शाहूपुरी एक असे एकूण सहा गुन्हे नोंद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाईतील चार बंदिस्त जागांपैकी शाहूपुरीतील सलूनची जागा ‘सील’ करून परवाना रद्द करण्याचा अहवाल महापालिकेला सादर करण्यात येईल. तसेच, इतर तीन जागामालकांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

जुगार अड्डा
Kolhapur News : धरणग्रस्तांना गरज पाठबळाची

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com