
Kolhapur Peace Meeting : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय चौक परिसरात काल रात्री झालेला वाद हा दोन समाजांतील नसून दोन मंडळांतील आहे. तो वाददेखील सामोपचाराने मिटवूया, असा निर्णय आज पोलिस अधिकारी, राजेबागस्वार दर्गा आणि सिद्धार्थनगर येथील नेते-कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. पोलिस अधीक्षक कार्यालयात ही बैठक झाली. राजेबागस्वार दर्गा आणि सिद्धार्थनगरातील समाजमंदिरातही बैठका घेऊन समझोता घडवून आणण्यात आला.