

Kolhapur Collector Office Bomb Alert
esakal
Collector Office RDX Threat Bomb : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. कार्यालयाला आलेल्या धमकीच्या मेलमध्ये ५ किलो आरडीएक्स ठेवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही माहिती समोर येताच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले.