Kolhapur Corporation : मनपा डांबरी प्लांट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी यापूर्वी नेहमी उपयोगी असणारा महापालिकेच्या स्वमालकीचा डांबरी प्लांट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गाडून बंद पाडण्यात आला आहे
Kolhapur Corporation
Kolhapur Corporationsakal media

कोल्हापूर : शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी यापूर्वी नेहमी उपयोगी असणारा महापालिकेच्या स्वमालकीचा डांबरी प्लांट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गाडून बंद पाडण्यात आला आहे. शहरातील पॅचवर्कची कामे मर्जीतल्या ठेकेदारांना देण्यासाठी हा प्लांट बंद पडल्याची चर्चा आहे. प्लांट सुरू करण्याची मानसिकताही प्रशासनाची दिसत नाही. नगरोत्थान योजनेतून अशा प्रकारच्या प्लांटसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था केली असतानाही प्लांट सुरू करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत.

महापालिका पूर्वी पॅचवर्कच्या कामांना पावसाळ्याचे चार महिने सोडले, तर नेहमीच प्राधान्य देत होती. त्यासाठी चारही विभागीय कार्यालयाकडे स्वतंत्र अभियंता, स्वतंत्र डांबरी बॅच होती. कसबा बावड्यात जिथे सध्या झूम प्रकल्प आहे, तेथे हा प्लांट कार्यरत होता. यामधून तयार केला जाणारा प्रिमिक्स माल गुणवत्तापूर्ण होता. त्यामुळे रस्त्यांची, पॅचवर्कची कामे डिपार्टमेंटल करण्यावर नगरसेवकांचाही कल होता. महापालिकेत चांगले चालले आहे, ते बंद पाडून मर्जीतल्या ठेकेदारांचे उखळ पांढरे करणारी एक यंत्रणाच कार्यरत आहे.

या यंत्रणेने डिपार्टमेंटल काम करण्याची एक चांगली व्यवस्थाच बंद पाडली. यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेच्या रुटीनचा भाग होता. पावसाळ्यात कच्चा मुरूम टाकून खड्डे बुजवले जायचे, तर उर्वरित आठ महिन्यांत खड्डे बुजवण्याची यंत्रणा कार्यरत असायची. आता हा प्लांटच बंद पडल्याने शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहेच; पण ठेकेदारांकडून पॅचवर्कची कामे कशीबशी आटोपली जातात. त्याचा दर्जाही सुमार आहे.

"महापालिकेच्या स्वमालकीचा डांबरी प्लांट सध्या बंद असला तरी तो सुरू करणार आहोत. पावसाळ्यामुळे हे काम लांबले. या प्लांटवर कचरा आहे, लिचेडमुळे मशिनरी खराब झाली आहे. कचरा बाजूला करून डांबरी प्लांट दुरुस्त करणार आहोत."

- नितीन देसाई, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com