

कोल्हापुरातील पती पत्नीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू नाही तर कुख्यात गुंडाने दगडाने ठेचून केला खून, कारण काय?
esakal
Kolhapur Killing Case : शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण पाणलोट क्षेत्रालगत झालेल्या निनू यशवंत कंक (वय ७०) व रखुबाई निनू कंक (६५) यांच्या खूनप्रकरणी अट्टल चोरट्याला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली. विजय मधुकर गुरव (३५, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) असे त्याचे नाव आहे. दगडाने ठेचून त्याने कंक दांपत्याला संपवल्याचे समोर येत आहे. मात्र, हे खून त्याने नेमके कोणत्या कारणातून केले याचा शोध पोलिस घेत आहेत. संशयिताला आज न्यायालयात हजर करण्यात आले.