Why Were Doctors Suspended in Kolhapur?
esakal
कोल्हापूर : सीपीआरमधील लाल डायरीप्रकरणी चौकशीत दोषी असल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर व तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात (Kolhapur CPR Red Diary Case) आली. याबाबतचे आदेश रात्री उशिरा सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी नील कुमेरिये यांनी काढले.