
1600 artists recite the Indian Constitution Preamble in 20 languages at Kolhapur’s Dasara Chowk."
Sakal
कोल्हापूर : संगीताचा सुमधूर ठेका, सोळाशे कलाकारांचा सहभाग व सळसळत्या उत्साहात सादर झालेल्या भारतीय संविधानातील प्रास्ताविकेने अनोख्या विश्वविक्रमाची आज नोंद केली. वीस भाषांत ही प्रास्ताविका सादर झाली आणि भारतीय संविधानाचा विजय असो, अशा घोषणेने ऐतिहासिक दसरा चौकातील मैदान दणाणून गेले. मुंबई, कोकणसह विविध जिल्ह्यांतील कलाकार प्रास्ताविका सादर करण्यासाठी सहभागी झाले होते.