

Grandson poisons grandmother in Kolhapur for gold jewellery
esakal
Kolhapur poisoning case : ऋणमुक्तेश्वर परिसरातील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या उषा मारुती भिऊंगडे (वय ७२) यांचा चुलत नातवानेच विष देऊन खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी प्रेम परशुराम भिऊंगडे (वय २०, रा. ज्ञानसागर रेसिडेन्सी, फुलेवाडी रिंगरोड) याला अटक केली आहे. आजीच्या दागिन्यांची चोरी करून चैनी करण्याच्या हेतूने त्याने चहातून विष पाजल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने या खुनाचा उलगडा करत चोरीचे दागिने जप्त केले.