

Kolhapur Double Killed Hupari
esakal
Hupari Killed Case Kolhapur : (बाळासाहेब कांबळे) : हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मुलानेच आपल्या वृद्ध आई-वडिलांचा अत्यंत निघृणपणे खून केल्याची घटना आज पहाटे सव्वापाचच्या सुमारास उघडकीस आली. खून केल्यानंतर संशयिताने स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.