हल्लेखोरांनी त्याच्यावर त्वेषाने हल्ला केल्याचे दिसते. कोयत्याने सपासप वार केले आहेत. डोक्यात आठ वर्मी घाव घातल्याने त्याची कवटी फुटली.
पेठवडगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथे पूर्ववैमनस्यातून तीन तरुणांनी धारदार कोयत्याने हल्ला करून एका तरुणाचा निर्घृण खून (Murder Case) केला. यश किरण दाभाडे (वय १९, रा. अंबप, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात वर्मी घाव घातल्याने तो जागीच कोसळला. अंबपमधील पाण्याच्या टाकीसमोर सायंकाळी सातच्या सुमारास हल्ला झाला.