
वाहनांचे नंबर प्लेट आणि स्टिकर बदलून महिलांची रेकी करून दागिने चोरायचे
esakal
Kolhapur Crime : वाहनांच्या नंबर प्लेट आणि स्टिकर बदलून महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक झाली. इम्रान समसुद्दीन मोमीन (वय ३८, रा. बेघर वसाहत हेर्ले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि सुदाम हणमंत कुंभार (वय ४०, रा. आंधळी, ता. पलूस, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याची दोन मंगळसूत्रे, मोटार व इतर साहित्य असा सुमारे नऊ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर ते सांगली फाटा दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून जबरी चोरीचे दोन, मोटारसायकल चोरीचा एक असे तीन गुन्हे उघडकीस आले.