
कोल्हापूर : धार्मिक अन् सामाजिक सलोख्याची जाणीव असलेलं कोल्हापूर शहर आत्तापर्यंत शांत होतं. पण अलिकडच्या काळात इथली सामाजीक वीण उसवत चालल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कारण गँग्स ऑफ वासेपूर या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरचं देखील नाव 'गँग्स ऑफ कोल्हापूर' व्हायला लागलं आहे.
सहा महिन्यांपूर्वी शहरात दंगलीनं हादरलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी खुनाची घटना आणि आता पुन्हा एकदा कोयते, तलवारी घेऊन टोळ्या शहरात धुमाकूळ घालताना दिसत आहेत. नुकत्याच एका घटनेत व्हॉट्सअॅपला चिथावणीखोर स्टेट्स ठेवून एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.