

Kolhapur Pune Accident
esakal
Pune Kolhapur Accident News : पुण्यातील नवले पुलावर अतिवेगाने आठ जणांचा बळी घेतल्याची घटना आठ नोव्हेंबरला घडली. ब्रेकफेल कंटेनरने अनेक वाहनांना चिरडले. याच अपघाताची पुनरावृत्ती कोल्हापुरातील सायबर चौकात होता होता राहिली. आजच्या ब्रेकफेल ट्रकने सहा वाहनांना उडवले. मोटारीसह टेपोंचा चुराडा झाला असून, वारंवार होणाऱ्या अपघातांनी सायबर चौक चर्चेत आला आहे. अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करणे गरजेचे बनले आहे.