Kolhapur Accident : कोल्हापूर सायबर चौकात ब्रेकफेल ट्रकचा थरार; उसाच्या ट्रकने पाच वाहनांना उडवलं

Kolhapur Csiber Chowk Accident : कोल्हापूरच्या सायबर चौकात उसाने भरलेल्या ब्रेकफेल ट्रकने अचानक नियंत्रण सुटल्याने थरार निर्माण झाला. या ट्रकने पाच वाहनांना जोरदार धडक देत उडवले.
Kolhapur Accident

Kolhapur Accident

esakal

Updated on
Summary

घटनाक्रम

सायंकाळी ७ वाजून १० मिनिटे - ट्रकची सहा वाहनांना धडक, मोठा आवाज, नागरिकांची धावपळ

सायंकाळी ७ वाजून १३ मिनिटे - चालक सुनील रेडेकर यांना मोटारीतून बाहेर काढले

सायंकाळी ७ वाजून २० मिनिटे - पोलिस, अग्निशमन दलाचे जवान दाखल

रात्री ८ वाजता - क्रेन दाखल, ट्रकला बांधून तीन वाहने बाजूला केली.

रात्री ८ वाजून ४० मिनिटे - सर्व चारही वाहने वाजूला करण्यात यश

रात्री उशिरा ट्रकमधील ऊस काढून एकाबाजूने वाहतूक सुरू...

Kolhapur Csiber Chowk Truck Accident : ऊस वाहतूक करणारा ट्रक सायबर चौकाकडे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून सिग्नलला थांबलेल्या पाच वाहनांना फरफटत नेले. सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या ब्रेकफेल ट्रक अपघाताचा थरार अनेकांनी प्रत्यक्षात अनुभवला. मोठा आवाज झाल्याने चौकात एकच धावपळ उडाली. सुदैवाने ट्रकखाली सापडलेल्या मोटारीचे चालक सुनील रेडेकर (रा. मोहिते कॉलनी) आश्चर्यकारकरीत्या बचावले. सहा वाहनांचे अपघातात नुकसान झाले असून ट्रकचालक प्रदीप महादेव सुतार (वय ४०, रा. पट्टणकुडी, कर्नाटक) याला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com