कोल्हापूर : शहरात ५८ इमारतींचा ‘धोका’ कायम

मालक-कूळ वादात अनेक ठिकाणी कारवाई नाही
 इमारतींचा ‘धोका’ कायम
इमारतींचा ‘धोका’ कायमsakal

कोल्हापूर: शहरातील ५८ धोकादायक असलेल्या इमारती ‘जैसे थे’ आहेत. त्यातील सर्वात जास्त ४९ इमारती छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित आहेत. अनेक वर्षांपासून त्यांना नोटीस दिल्या जात असून, काहींवर कारवाई केली आहे; पण काहींचा धोका आणखी वाढत चालला आहे. पावसाळ्यात aत्याचा काही भाग ढासळण्याची शक्यता असल्याने महापालिका यंत्रणा सतर्क असली तरी कारवाई झाली तरच पुढील धोका टाळता येणार आहे.

चार विभागीय कार्यालयांच्या अखत्यारित असणाऱ्या धोकादायक इमारतींची दर पावसाळ्यापूर्वी यादी काढून त्यांना रीतसर नोटीस दिल्या जातात. काही इमारतींत मालक-कूळ असा वाद न्यायालयात आहे. त्यामुळे दुरुस्ती केलेली नाही. अनेक इमारतींचे काही भाग यापूर्वी पाडले. काही इमारतींची दुरुस्ती करून घेतली. त्या इमारतींचा धोका तात्पुरता टळला आहे. २००६ पासून टप्प्याटप्प्याने महापालिका कारवाई करत आली आहे. तीन वर्षांत पाडण्याबरोबर काहींची दुरुस्तीही केली आहे. ८१ इमारतींचे काही भाग उतरवले, तर काही पाडल्या. लक्ष्मीपुरीतील दुमजली चावरेकर चाळ धोकादायक बनली आहे. काही भागाची गॅलरी मोडली आहे. महापुरात तळ मजल्याला पाणी लागले होते. महापालिकेने गेल्यावर्षी या चाळीचा वापर बंद करून इमारत उतरून घेण्याची नोटीस दिली आहे. तरीही इमारतीत रहिवाशी आहेत. अर्ज देऊनही दखल घेतलेली नाही. पाऊस, पुरामुळे जीवित वा वित्त हानी झाल्यास त्याला जबाबदार राहणार नाही, असे महापालिका आयुक्तांना गेल्या वर्षी इमारत मालकांनी निवेदन दिले आहे.

विभागीय कार्यालयनिहाय स्थिती

विभागीय कार्यालय १

  • इमारतींबाबत न्यायालयीन खटले - २

  • विभागीय कार्यालय २

  • १३० इमारतींपैकी ८१ वर कारवाई, १३ बाबत खटले, ३६ उतरवणार

  • विभागीय कार्यालय ३

  • १७ इमारतींपैकी ९ वर कारवाई, ४ दुरुस्त, ४ उतरवणार

  • विभागीय कार्यालय ४

  • २० इमारतींपैकी ५ इमारती रिकाम्या, ३ उतरविल्या, १२ दुरुस्ती सुरू

  • दोन वर्षांत कार्यालयाच्या अखत्यारितील उतरवलेल्या तसेच दुरुस्ती केलेल्या इमारतींची संख्या ४२ आहे. उर्वरित इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे. नोटीस दिल्या आहेत.

  • - नारायण भोसले, उपशहर अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com