

Kolhapur Danoli Crime news
esakal
Kolhapur latest crime news : (युवराज पाटील) : कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी येथे काल (ता.१३) सोमवारी रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय ४०) याचे अज्ञातांनी अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरणकर्त्यांनी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा या घटनेत कोणताही संबंध नसल्याचे बोलले जात आहे. शेरी मळा येथील सरकारांच्या शेतात ही घटना घडली आहे.