esakal | गड्या आपला गाव बरा म्हणत 40000 लोक दाखल ; 13 हजार कर्मचारी लढ्यासाठी सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur district 13 thousand workers ready kolhapur marathi news

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्व गावांच्या सीमा बंद करण्यात आले आहेत. तसेच मागील आठ- दहा दिवसापासून जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे.

गड्या आपला गाव बरा म्हणत 40000 लोक दाखल ; 13 हजार कर्मचारी लढ्यासाठी सज्ज

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर  : संपूर्ण जगभर, देशात आणि राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. त्यामुळेच गड्या आपला गाव बरा ,असे म्हणत अनेक लोकांनी गावाकडे धूम ठोकली आहे. मागील आठ ते दहा दिवसात जिल्ह्याबाहेरील 40 हजार पेक्षा अधिक लोकांनी प्रवेश केला आहे. ही संख्या अजूनही वाढत आहे. या सर्व लोकांना शोधून त्यांचे आरोग्य तपासणी करणे आणि जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी तब्बल 13 हजार कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यात कोरोना ने थैमान घातले आहे. कोरोनचे देशात 580 रुग्ण झाले असतानाच अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भीतीचे सावट वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. परदेशातून येणारी सर्व विमाने रद्द केली आहेत. रेल्वेसेवा ,बससेवाही बंद केली आहे. खाजगी वाहनांना ही प्रवेशबंदी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही विविध प्रकारची दक्षता घेतली जात आहे.

हेही वाचा- गर्दी टाळण्यासाठी देवरुखने लढवली अशी युक्ती...

बाहेरून 40000 लोक जिल्ह्यात दाखल

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्व गावांच्या सीमा बंद करण्यात आले आहेत. तसेच मागील आठ- दहा दिवसापासून जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्या बाहेरून तसेच विदेशातून कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 40 हजार लोक आले आहेत. तसेच अजूनही अनेक लोकांची नोंद घेणे बाकी आहे. जोपर्यंत या सर्व लोकांची नोंद होत नाही व आरोग्य तपासणी होत नाही तोपर्यंत कोरोनाचा नेमका किती धोका आहे ते समजणार नाही.

 हेही वाचा- ब्रेकिंग- सांगलीत कोरोना पॉझिटीव्ह 9 : प्रशासन अधिक सर्तक....

 जिल्ह्यात 13 हजार कर्मचाऱ्यांची फौज

बाहेरून आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे विविध पथके कार्यरत आहेत. बाहेर देशातून आलेल्या तसेच मुंबई, पुणे इथून आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कडूनच केली जात आहे. आरोग्य विभागाचे १५०० कर्मचारी तसेच 3000 आशा वर्कर , ८ हजार अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी सुरू आहे.

कोरांटाईन साठी राखीव कक्ष

आरोग्य विभागाकडे सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. मोठ्या प्रमाणात जे बाहेरून प्रवासी येत आहेत त्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरांटाईन साठीही काही कक्ष जिल्हाभरात राखीव ठेवण्यात आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष व आरोग्य सभापती आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात विभाग कार्यरत आहे.

- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.