esakal | Kolhapur : हद्दपारी कारवाईत जिल्हा आघाडीवर
sakal

बोलून बातमी शोधा

Gang Arrest Police

Kolhapur : हद्दपारी कारवाईत जिल्हा आघाडीवर

sakal_logo
By
राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गणेशोत्सव काळात कोल्हापूर परिक्षेत्रातील गुन्हेगारांना पोलिसांनी लगाम घालण्यास सुरुवात केली. आतापर्यंत हजाराहून अधिक गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. जिल्हा पोलिस दलाने तीनशेहून अधिक गुन्हेगारांना कारवाईचा हिसका दाखवला.

गणेशोत्सव काळात शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महिनाभर आधीच पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरवात होते. कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्सवावर निर्बंध आहेत. मिरवणुकीवर बंदी आहे.

दक्षतेचा भाग म्हणून पोलिस यंत्रणेने कोल्हापूर परिक्षेत्रातील तालीम मंडळांच्या बैठका घेतल्या. नियमावलीबाबत प्रबोधन केले. आवश्यक त्यानुसार बंदोबस्तही तैनात केला. त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार केली. त्यांच्या विरोधात वेळीच हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केले. त्यानुसार परिक्षेत्रातील एक हजाराहून अधिक जणांना हद्दपार केले. यात जिल्ह्यातील ३२२ गुन्हेगारांचा समावेश आहे. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कारवाईचीही जोड पोलिसांनी दिली.

हेही वाचा: प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकरांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

त्रासदायक ठरणाऱ्या या गुन्हेगारांना पोलिसांनी वेळीच हिसका दाखवून सर्वसामान्यांना दिलासा दिला. हद्दपार केलेल्या या गुन्हेगारांवर वैयक्तिक लक्ष ठेवण्यावर अपुऱ्या मनुष्यबळामुळे मर्यादा येतात. तरीही हे गुन्हेगार बंदी आदेशाचा भंग करून पुन्हा हद्दीत पाय ठेवणार नाहीत याबाबतच्या उपाययोजना पोलिस ठाणे पातळीवर सुरू आहेत.

हेही वाचा: महापालिकेची रणधुमाळी मार्चला? आरक्षण सोडतीचा प्रश्न कायम

सार्वजनिक मंडळांची जिल्ह्यानुसार संख्या

कोल्हापूर - ७,१५०

सांगली - ३,३५५

सातारा - ४,६४७

सोलापूर ग्रामीण - १,९४४

पुणे ग्रामीण - ३,३४०

जिल्ह्यातील हद्दपारीचे स्वरूप

शहर - ९०

इचलकरंजी - ८४

जयसिंगपूर, शिरोळ- ६४

शाहूवाडी, करवीरसह अन्य - ८४

एकूण - ३२२

loading image
go to top