वडिलांच्या पराभवाची व्याजासह परतफेड; गायकवाडांचा दणदणीत विजय

गायकवाड यांची तिसरी पिढी बॅंकेत: मागील पराभवाची व्याजासह परतफेड
Ranveer Singh Gaikwad
Ranveer Singh GaikwadEsakal

कोल्हापूर : जिल्हा बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत (KDCC Bank Elections Result) शाहूवाडी सेवा संस्था गटातून उदय साखरचे संचालक रणवीरसिंग गायकवाड (Ranveer Singh Gaikwad) यांनी बँकेचे विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर (Sarjerao Patil Peridkar) यांचा दणदणीत पराभव केला.रणवीर यांना 66 तर पेरीडकर यांना 33 मते मिळाली.

गेल्या निवडणुकीत पेरीडकर यांनी मानसिंगराव गायकवाड (Mansingrao Gaikwad)यांचा केवळ दोन मतांनी पराभव केला होता.यावेळी पेरिडकरांपेक्षा दुप्पट मते घेऊन रणवीर गायकवाड यांनी आपल्या वडिलांच्या पराभवाची व्याजासह परतफेड केली. जिल्हा बँकेत रणवीर यांनी दमदार एंट्री केली आहे. रणवीर यांच्या रूपाने गायकवाड यांची तिसरी पिढी बँकेत प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी विरोधी जनसुराज्य गटाला आपली मतेही राखता आली नाहीत.

Ranveer Singh Gaikwad
KDCC Bank Elections Result : सत्तारूढ आघाडीच्‍या निवेदीता माने, ऋतिका काटकर विजयी

जिल्हा बँकेवर शाहूवाडी सेवा संस्था गटात माजी खासदार कै.उदयसिंहराव गायकवाड घराण्याचे बँक स्थापनेपासूनच वर्चस्व आहे. उदयसिंह गायकवाड यांनी बँकेचे अध्यक्षपद भूषविले. मानसिंगराव गायकवाड यांनी सलग तीन पंचवार्षिक बँकेवर प्रतिनिधित्व केले. 2001 ला त्यांची बँकेवर बिनविरोध निवड झाली होती. बँकेचे उपाध्यक्ष पदही त्यांनी सांभाळले.रणवीर यांच्या रूपाने गायकवाड घराण्याची तिसरी पिढी आता बँकेत इंट्री करत आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गायकवाड यांच्याकडे बहुमत होते.मात्र कायमचे विजयाने गाफील राहिल्याने पेरिडकर यांनी अवघ्या दोन मताने मानसिंगराव यांचा पराभव केला.त्या पराभवापासून गेली पाच-सहा वर्षे रणवीर गायकवाड यांनी सेवा संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घातले.माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर व मानसिंगराव गायकवाड यांची शाहूवाडीत युती आहे.सत्यजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रणवीर यांनी सेवा संस्था ताब्यात घेण्याबरोबरच निवडणुकीत ठराव कोणाचा करायचा याची सरूडकर व गायकवाड यांनी प्रथमपासूनच काळजी घेतली.

Ranveer Singh Gaikwad
ऐनवेळी मिळालेल्या उमेदवारीचे सार्थक; स्मिता गवळींची बाजी

आपल्या गटाच्या प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते यांच्या नावाचे ठराव करून घेतले. वेळीच ठराव धारकांना सहलीवर रवाना केले.कोणत्याही गोष्टीत कमतरता ठेवली नाही.त्यामुळेच दुप्पट मताधिक्य घेऊन रणवीर यांनी जिल्हा बँकेत विजयी पताका फडकावली.सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोठ्या बंधू प्रमाणे सत्यजित पाटील सरूडकर यांनी रणवीर यांना निवडणुकीत साथ दिली त्यामुळेच दमदार विजय झाला. विरोधी जनसुराज्यची मते फोडण्यात गायकवाड यांना यश आले. एकंदरीत जिल्हा बँक जिल्हा परिषद निवडणुकीत पेरिडकराकडून झालेल्या पराभवाचा वचपा यावेळी रणवीर यांनी सव्याज काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com