

Kolhapur District Bank
esakal
कोल्हापूर : एका संवादाच्या व्हायरल क्लिपमुळे जिल्हा बँकेतील ४० लाखांचा अपहर उघडकीस आला आहे. खिद्रापूर शाखेतील शिपायाने हा अपहार केला असून, यासाठी त्याने शाखाधिकारी आणि लिपिकाचा यूजर वापरल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचा प्राथमिक अहवाल मिळाला असून, चौकशी सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेमध्ये अभयसिंह रजपूत शिपाई म्हणून कार्यरत होता. त्याने २०२१ पासून येथे ठेवीवरील रक्कम स्वतःच्या, पत्नीच्या आणि मित्राच्या खात्यावर वळविल्या. त्याने तब्बल ४० लाख रुपये वर्ग केले. यासाठी शाखाधिकारी आणि लिपिकाचे यूजर वापरले.
अलीकडेच त्याची बदली अकिवाट येथील शाखेत झाली आहे. संशयास्पद व्यवहारामुळे रजपूतला वारंवार खिद्रापूर शाखेत बोलावले जात होते. यातून दोन कर्मचाऱ्यांमधील झालेला संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला.
यावेळी रजपूत याने केलेला अपहार समोर आला. दरम्यान, बँकेने त्याला याबाबतची माहिती देताच त्याने २७ लाख रुपये रोखीने भरले आहेत, उरलेले १३ लाख रुपये तो पुढील दोन-चार दिवसांत भरणार आहे, अशी माहिती त्याने बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे.
ज्यांच्या ठेवीच्या रकमा आपल्या नावे घेतल्या आहेत असा ग्राहक बँकेत आल्यास तो आपल्या खात्यावरील रक्कम काढून त्यांना देत होता.तरीही बँकेने केलेल्या गोपनीय तपासातून त्याने अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कबुली जबाबही त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहून दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.