Kolhapur : ...तर ‘गोकुळ’वर प्रशासकांची नियुक्ती होण्याची शक्यता

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) चाचणी लेखापरीक्षकांनी दहा दिवसांत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
olhapur District Co-operative Milk
olhapur District Co-operative Milksakal

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) चाचणी लेखापरीक्षकांनी दहा दिवसांत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकशीनंतर दोष आढळले, तर गोकुळवर प्रशासकांची नियुक्तीही होऊ शकते.

गोकुळमध्ये गैरकारभाराची चौकशी व्हावी, यासाठी संचालिका शौमिका महाडिक यांनी मागणी केली आहे. त्यानुसार बुधवारी (ता. ११) गोकुळमध्ये चाचणी लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. सौ. महाडिक यांनी गोकुळमध्ये झालेल्या लेखापरीक्षणात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. तसेच, सत्ताधाऱ्यांकडून प्रश्‍नांची योग्य व अपेक्षित उत्तरे दिली जात नाहीत, अशी तक्रारही जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती.

गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण होणार असल्याची माहिती समजली. तपासणीसाठी जे अधिकारी येतील, त्यांना गोकुळकडून सर्व सहकार्य केले जाईल. तपासणीसाठी आवश्‍यक असणारी सर्व माहिती दिली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com