
-ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर : जिल्ह्यात पंचगंगा, भोगावतीसह अन्य नदीकाठी शेतकऱ्यांनी खासगी जमिनीत माती उत्खनन सुरू केले आहे. वीटभट्टीसाठी ही माती वापरली जाते, मात्र यामुळे नदीच्या पात्रालगत असणारे नैसर्गिक बांध (लेव्ही) नष्ट होत असून, त्यामुळे महापूर काळातील नुकसानीचे प्रमाण वाढणार आहे. हे बांध म्हणजे भूरूप आहेत. हे बांधच नष्ट झाले, तर नदीची परिस्थिती (इकॉलॉजी) धोक्यात येणार आहे. करवीर तालुक्यातील कोगे गावामध्ये अशाप्रकारे सुमारे ५० हेक्टर जमिनीवर उत्खनन केले आहे.