कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी कोरोना बाधित ; पोलिस दलात खळबळ

Kolhapur district police Corona positive excitement in the police force
Kolhapur district police Corona positive excitement in the police force

कोल्हापूर - जिल्ह्यातील एक पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला. तशी पोलिस दलात खळबळ उडाली. तो कोणाकोणाच्या संपर्कात आला याची माहिती घेण्याचे संबधित यंत्रणेकडून तातडीने सुरू झाले.

करवीर तालुक्‍यातील एका गावात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हे पोलिस कर्मचारी जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्यावर न्यायालयीन कामाची जबाबदारी होती. ते गेल्या काही दिवसापासून पोलिस ठाण्याच्या संपर्कात नव्हते. पण ते गगनबावडा तालुक्‍यातून न्यायालयात गेल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे ते कोणाकोणाच्या संपर्कात आले याची माहिती संबधीत यंत्रणेकडून घेतली जात आहे. यापूर्वी जिल्ह्यातील एक पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com