
Kolhapur District Sarpanch Election : कोल्हापूर जिल्ह्यातील १०२६ गावच्या कारभाऱ्यांचे आरक्षण पुन्हा काढण्यात येणार आहे. त्यासाठी २१ जुलैचा मुहूर्त निश्चित केला असून, त्यादिवशी सोडतीद्वारे नवे आरक्षण जाहीर होईल. ५ मार्च रोजीच्या अधिसूचनेद्वारे एप्रिल महिन्यात जाहीर झालेले सरपंच आरक्षण आता रद्द होणार असून, पुन्हा नव्याने काढण्यात येणार असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.