

Best friends fight after abuse ends in death Kolhapur
esakal
Kolhapur Crime News Today : दारू पिण्याच्या कारणावरून विक्रमनगर परिसरात नशेतच दगडाने ठेचून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. विकास दत्तात्रय भोसले (वय ३२, रा. येलूर, मलकापूर, ता. शाहूवाडी, सध्या रा. विक्रमनगर) असे त्याचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित ओंकार महादेव काळे (वय २५, रा. शाहू कॉलनी, तिसरी गल्ली, विक्रमनगर, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे.