

शेतकऱ्याचा रुबाब भारी, भात मळणीसाठी वापरली महिंद्रा थार
esakal
Kolhapur Farmer Viral Video : (रणजित कालेकर) : ग्रामीण भागात सुगीची धांदल सुरू आहे. शेतकरी भाताच्या मळणीसाठी अधिकत्तर यांत्रिकीकरणाचा वापर सर्वत्र होत आहे. अशा काळात कोरिवडेतील युवा शेतकरी धनाजी सयाजी देसाई यांनी भाताच्या मळणीसाठी चक्क थार गाडीचा वापर करून भाताची मळणी काढली. अवकाळी पाऊस व मजूर टंचाईवर मात करण्यासाठी त्यांना अशी शक्कल लढवावी लागली आहे. याची चर्चा समाजमाध्यमावर सुरू आहे.