

Kolhapur Accident
esakal
Kolhapur Tragic Road Accident : कोल्हापूर-गारगोटी मार्गावर चुये फाट्याजवळ व्हॅन आणि दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत आज दोघे ठार झाले. दुचाकीस्वार शिवाजी शंकर कोळी (वय ४५ रा. कागल) आणि व्हॅनचालक अतुल अरविंद पाटील (३० रा. गुडाळ, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत.
व्हॅनमधील गजानन प्रभाकर चौगले (रा. तारळे), अनिल शिवाजी जाधव (रा. धामोड) तसेच दुचाकीवरील वैशाली शिवाजी कोळी व त्यांची नात सुप्रिया चेतन दळवी (३) जखमी झाले. इस्पुर्ली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.