
Kolhapur Building Slab Collapse
esakal
ठळक मुद्दे, Highlight :
सायंकाळी सातनंतर स्लॅब टाकण्याचे काम सुरू, रात्री साडेनऊच्या सुमारास स्लॅब कोसळला
१०८ रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले, सव्वा दहाच्या सुमारास तिघा कामगारांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश
जखमींना तातडीने सीपीआरकडे हलविले, सीपीआरमध्ये जखमींच्या नातेवाइकांसह नागरिकांची गर्दी, साडेअकरा वाजता मदतकार्य थांबविण्यात आले.
Kolhapur Latest Breaking News : महापालिकेच्या फुलेवाडी अग्निशमन दलाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून मंगळवारी रात्री कामगार जागीच ठार झाला, तर यात बहीण-भावासह एकूण सहाजण जखमी झाले. नवनाथअण्णा कागलकर (वय ३८, रा. राजारामपुरी) असे मृताचे नाव आहे. अक्षय पिराजी लाड (३०, शिवशक्ती कॉलनी, गंगाई लॉन), दत्तात्रय सुभाष शेंबडे (३७), वनिता बापू गायकवाड (४०), जया सुभाष शेंबडे (३६), सुमन सदा वाघमारे (६०) या दुर्घटनेत जखमी झाले.
रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसर हादरून गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्लॅबच्या ढिगाऱ्याखालून कामगारांना बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्नांची शिकस्त केली.