Kolhapur Building Slab Collapse : काँक्रिट वर नेताना लिफ्ट हलली अन्, अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीच्या स्लॅब कोसळला; नेमकं काय घडलं

Building Slab Collapse : स्लॅब कोसळल्यानंतर वरील काही जणांनी उड्या मारल्या. तर काही स्लॅबखाली अडकले, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
Kolhapur Building Slab Collapse

Kolhapur Building Slab Collapse

esakal

Updated on
Summary

ठळक मुद्दे (Highlights)

स्लॅब कोसळून दुर्घटना – मंगळवारी रात्री अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीच्या स्लॅबचे काम सुरू असताना सिमेंट माल नेणाऱ्या लिफ्टमुळे धक्का बसून स्लॅब कोसळला, यात एक मजूर ठार झाला व चौघे जखमी झाले.

मदत व बचावकार्य – दुर्घटनेत सातजण अडकले होते, स्थानिक नागरिक, महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात आले. तिघे उड्या मारून बचावले, तर तिघे जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

चौकशीची दिशा – बांधकामाचा ठेका रेणुका कन्स्ट्रक्शन (मालक शशिकांत पवार) यांना मिळाला होता. दुर्घटनेबाबत कंत्राटदाराची जबाबदारी, सुरक्षा उपाय व सीसीटीव्ही तपासणी होणार असून, महापालिका चौकशीनंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Kolhapur Building Slab Collapse : अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीच्या स्लॅबचे काम मंगळवारी रात्री सुरू होते. रात्री साडेनऊच्या सुमारास बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्य पुरविण्यासाठी शेजारी उभी केलेली लिफ्ट सिमेंटचा माल वर नेताना हलली. त्यामुळे स्लॅबला धक्का बसून दुर्घटना घडली. त्यामध्ये काहीजण स्लॅबवर व काहीजण खाली होते. स्लॅब कोसळल्यानंतर वरील काही जणांनी उड्या मारल्या. तर काही स्लॅबखाली अडकले, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com