कोल्हापूर : कुरुंदवाडजवळ शेकडो मासे मृत

पंचगंगेच्या पात्रात रासायनिक पाणी; मासे नेण्यासाठी एकच गर्दी
मासे मृत
मासे मृतsakal

कुरुंदवाड : पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त पाणी मिसळल्याने ऑक्सिजनअभावी कुरुंदवाड - शिरढोण पुलाखाली हजारो मासे तडफडून मृत्युमुखी पडले आहेत. मृत झालेल्या माशांचा खच काठांवर जागोजागी दिसत होता. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळेच नदी प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नदीचे प्रदूषण करणाऱ्‍या घटकावर कारवाई करावी, अशी मागणी पंचगंगा नदी प्रदूषण लढ्याचे कार्यकर्ते विश्‍वास बालिघाटे व बंडू पाटील यांनी केली आहे.

पाण्यावर तरंगणारे मृत मासे पकडण्यासाठी कुरुंदवाडसह परिसरातील लोकांनी आज सकाळी दहा ते दुपारी दीडपर्यंत एकच गर्दी केली. काहींनी पोते भरून भरून तडफडणारे व मृत मासे विक्रीसाठी नेले. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍न दरवेळी नवे रूप घेऊन येताना दिसत आहे. प्रत्येकवेळी हजारो मासे मृतावस्थेत आढळतात. नदी प्रदूषित झाल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा स्त्रोतही खराब झाले आहेत. शिरढोण पूल ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंतचे पात्र तीन महिन्यांपासून जलपर्णीने व्यापले आहे. इचलकरंजीला जाणाऱ्‍या कृष्णा पाणी योजनेच्या पाईपलाईनचे काम नदीपात्रात सुरू आहे. यासाठी पात्रातच मोठा बांध घातला आहे. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबून असून पाण्याचा रंग व वास बदलला आहे. त्यातच इचलकरंजी येथील काळ्या-ओढ्यातून रासायनिक पाणी नदी पात्रात मिसळल्याने पाणी रसायनमिश्रित बनले. परिणामी, पाण्यातील ऑक्सिजनची कमालीची घटली आहे. परिणामी, मासे तडफडू मृत होत आहेत. हजारो मासे मृत होऊन वहात काठांपाशी आले आहेत.

जबाबदारी कोण घेणार : बालिघाटे

नदीप्रदूषणाला इचलकरंजी येथील काळ्या ओढ्यातून येणारे रसायनमिश्रित काळे पाणी कारणीभूत असताना इचलकरंजी पालिका, औद्योगिक वसाहती, प्रोसेस व अन्य कारखान्यातून बाहेर पडणाऱ्‍या पाण्यावर प्रक्रिया होत नाही. त्यामुळे जीवघेणा प्रश्‍न निर्माण होतो. या प्रदूषणाची जबाबदारी कुणाची व कारवाई कोण करणार, असा सवाल बालिघाटे बंडू पाटील, योगेश जिवाजे, बंडू उमडाळे आदींनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com