
Kolhapur Flood Update : कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झाल्याने मोठे अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान कोल्हापूर - गगनबावडा या मार्गावर आलेले पुराचे पाणी कमी झाल्यामुळे कोल्हापूर - गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. अशी माहिती सहायक निरीक्षक रणजीत पाटील यांनी माहिती दिली. तर करवीर तालुक्यातील चिखली येथील पूरग्रस्त नागरिकांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे, अशी माहिती करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली.