kolhapur forest department Trick to catch a leopard
kolhapur forest department Trick to catch a leopard

बळीच्या बकऱ्याऐवजी बळीचा कुत्रा; बिबट्याला पकडण्यासाठी शक्कल

Published on

शिये (कोल्हापूर ) : बिबट्याला पकडण्यासाठी बळीच्या बकऱ्याऐवजी बळीचा कुत्रा अशी शक्कल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लढवली आहे. 

सादळे - मादळे ( ता. करवीर ) येथे बुधवारी ( ता. 7 ) आणि गुरुवारी ( ता. 8 ) सलग दोन दिवस रात्री बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला आज सापळा लावावा लागला. या सापळ्यात बकरी ठेवावी तर त्यासाठी होणारा खर्च आणि त्यासाठी घ्यावी लागणारी मंजूरी हा गंभीर विषय बनला. मग त्यांनी शक्कल लढवली आणि बकरी ऐवजी काळ्या रंगाचे कुत्रेच सापळ्यात बांधले. 

सादळे, मादळे आणि शिये परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांनीही बिबट्या असल्याच्या बातमीला दुजोरा दिला. त्यानंतर वन विभागाच्या रेस्क्यू टीमने दोन दिवस या परिसराची पाहणी केली. दरम्यान बिबट्याने भटक्या कुत्र्यांची शिकार केली असल्याचीही चर्चा आहे.

 हा बिबट्या मादी असून तिच्याजवळ एखादे पिल्लू असल्यानेच या परिसरात बिबट्याचा एवढे दिवस मुक्काम असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिबट्याचा हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये यासाठी वन विभाग विशेष काळजी घेत आहे. स्थानिक तरुणही त्यांच्या सहकार्यासाठी तत्पर आहेत. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्याचा निर्णय आज झाला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com