

Kolhapur Forest Incident
esakal
Forest Department Chase Kolhapur : सडेगुडवळे (ता. चंदगड) गावच्या हद्दीत शिकारीच्या उद्देशाने दोन मोटारीतून आलेल्या संशयितांचा वन विभागाच्या गस्ती पथकाने थरारक पाठलाग केला. यावेळी संशयितांनी एक मोटार रस्त्याकडेला सोडून पलायन केले. मोटार व सापडलेल्या साहित्याच्या आधारे तपास करत वन विभागाने तिघांना अटक केली असून, आणखी सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत शिकारीसाठी वापरण्यात येणारी मोटार, दारूगोळा व शस्त्रांसह एकूण पाच लाख २१ हजार ११५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.