

Kolhapur Crime : कोल्हापूर अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी शिरोली येथील स्मशानभूमित अघोरी प्रकाराची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा कोल्हापुरात धक्कादायक घटना समोर आली आहे. चुटकी वाजून भूतबाधा, करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकांचा कारनामा उघड झाला आहे. दरम्यान, भोंदू बाबा मांत्रिकांची कोल्हापूर जिल्हासह, शहरावरही वचक होती. मांत्रीकाचा अघोरी प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा भोंदू बाबा कोल्हापूर शहरातील टिंबर मार्केट परिसरात राहत असल्याची माहिती आहे.