कुडित्रे : कोल्हापूर विभागात गाळप हंगामाला गती आली आहे. एक नोव्हेंबर ते आजपर्यंत ३७ साखर कारखान्यांनी ७१ लाख टन ऊस गाळप करून ६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागाचा निव्वळ साखर उतारा ९.५४ टक्के राहिला आहे. .ऊस बिले ४७९ कोटी अदा केली आहेत. तर विभागात २९५ कोटी ७३ लाखांची एफआरपी थकीत आहे. दहा दिवसांत एकूण एक कोटी टन ऊस गाळप झाल्यानंतर हंगाम निम्म्यावर येईल, असे चित्र आहे..Kolhapur News: थकीत एफआरपीवर १५% व्याजासह निर्णय मार्गी? साखर आयुक्तांच्या बैठकीत कारवाईची मोठी घोषणाबाजी.जिल्ह्यात २२ कारखान्यांनी ४२ लाख ८५ हजार टन ऊस गाळप करून ४१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा ९.५७ टक्के राहिला आहे. तर सांगली जिल्ह्यात १५ साखर कारखान्यांनी २८ लाख टन ऊस गाळप करून २६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. येथील साखर उतारा ९.४८ टक्के राहिला आहे..कोल्हापूर विभागात १७ कारखान्यांनी ४७९ कोटी ११ लाख रुपये बिल, एफआरपी अदा केली आहे. तर २२ साखर कारखान्यांकडे २९५ कोटी ७३ लाख रुपये बिल थकीत असल्याची माहिती साखर सह संचालक सूत्रांनी दिली. .Kolhapur News : ऊसतोडीत राजकारणाचा पगडा! ओळखीवाल्यांचा ऊस तातडीने; बाकींची केवळ प्रतीक्षा.दरम्यान, नोव्हेंबर व डिसेंबरच्या दहा तारखेपर्यंत ७१ लाख टन ऊस गाळप झाला आहे, तर लवकरच एक कोटी टन ऊस गाळप होऊन म्हणजे निम्मा हंगाम होईल. जानेवारी अखेर, किंवा फेब्रुवारी पहिला पंधरवडा हंगाम चालेल, असा अंदाज आहे. .कारखाने एकीकडे कायद्यावर बोट ठेवून एफआरपीच्या वर पहिला हप्ता देणार नाही म्हणतात, तर मग त्याच एफआरपीच्या कायद्यानुसार ऊस तुटल्यावर १४ दिवसांत बिल दिले पाहिजे, हे मात्र सोईस्कररीत्या विसरतात. जे कारखाने १४ दिवसांत एफआरपी देण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यांना थकीत रकमेवर १५ टक्के व्याज द्यावे लागेल. तसे आदेश साखर सहसंचालक यांना काढण्यास भाग पाडले जाईल.- धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश संघटना..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.