

Kolhapur Ganesh Visarjan
esakal
कोल्हापूर : ‘निरोप घेतो आता आम्हां आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी...’ अशी प्रार्थना करत उद्या (शुक्रवारी) सार्वजनिक मंडळांच्या गणरायांचे विसर्जन होणार आहे. पारंपरिक थाट आणि प्रबोधनाचा जागर करतच बहुतांश मंडळे मिरवणुका काढणार असून, मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, महाद्वार रोडवर मंडळांसाठी वीस मिनिटांच्या कालावधीसाठी पहिल्यांदाच सिग्नल यंत्रणा उभी केल्याने मिरवणुकीला गती येणार आहे.
दरम्यान, उद्याच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी मंडळांनी मध्यरात्रीनंतर सुरू केली होती. त्याचवेळी मिरजकर तिकटी, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, ताराबाई रोड, गंगावेस, रंकाळा स्टँड परिसरात खाद्यपदार्थांसह खेळण्याचे स्टॉल, करमणुकीच्या साधनांनी हजेरी लावली आहे.
विसर्जन मिरवणुकीत प्रेशर मिडस व कार्बनडाय ऑक्साईड कॅनिस्टर गॅससह लेसर लाईट वापरास प्रशासनाकडून बंदी मिरवणुकीवेळी ड्रोन कॅमेरा उडविणे व चित्रीकरणासही बंदी आहे. फटाके व लेसर शोवर बंदीसह साउंड सिस्टीमलाच ध्वनिमापन नियंत्रण यंत्र बसवा आणि मंडळांकडून एक लाख रुपये अनामत रक्कम भरून घेण्याचे आदेश ध्वनिप्रदूषण झाल्यास संबंधित ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासनाकडून नियोजन पूर्ण.
मिरवणूक पाहण्यासाठी येताना कानात कापसाचे बोळे घालावेत आणि डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.