Kolhapur Ganesh Visarjan : ‘दिग्गज’ मंडळांची दादागिरी चालणार नाही पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचा इशारा ; महाद्वार रोडवरही ‘टायमर’ आधारेच वेळा निश्चित

Seven Timer Signals Installed Along Visarjan Route : कोल्हापूरच्या महाद्वार रोडवरील गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळांना एका ठिकाणी २० मिनिटांची मर्यादा राहणार आहे.
Kolhapur Ganesh Visarjan

Kolhapur Ganesh Visarjan

esakal

Updated on

कोल्हापूर : महाद्वार रोडवर आलेल्या मंडळांना एका जागेवर २० मिनिटेच थांबण्याची संधी दिली जाईल. राजारामपुरी आगमन मिरवणुकीप्रमाणे या मार्गावरही सात ठिकाणी सिग्नल लावले आहेत. ‘दिग्गज’ मंडळांची दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिला आहे.

भाविकांमधील चेंगराचेंगरीचे प्रसंग टाळण्यासाठी सर्व ‘मिक्सिंग पॉईंट’वर अनुभवी अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमला आहे. गणेश आगमन मिरवणुकीवेळी राजारामपुरीत पोलिस प्रशासनाने ‘टायमर’चा प्रयोग यशस्वी केला.

Kolhapur Ganesh Visarjan
Railway Recruitment Setback : रेल्वे भरतीतील संधी ३ मार्कांनी हुकली; भामटेमधील २३ वर्षीय युवतीने घेतला टोकाचा निर्णय

आता विसर्जन मिरवणुकीतही हा प्रयोग केला जाणार आहे. मिरजकर तिकटी ते गंगावेश मार्गावर सात ठिकाणी सिग्नलआधारेच मंडळांना इशारा दिला जाईल. वीस मिनिटांहून अधिक वेळ मंडळाला एका ठिकाणी थांबून मिरवणूक रेंगाळत ठेवता येणार नाही.

मुख्य मार्ग बिनखांबी गणेश मंदिराकडून पापाची तिकटीकडे जातो. या मार्गावरून भाविकांनी उलट्या दिशेने येऊ नये. ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी रोड, भेंडे गल्ली या मार्गांवरूनही मुख्य मिरवणुकीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. पिशवीकर हॉस्पिटल, कसबा गेट चौकी, पुष्कराज तरुण मंडळ, गुजरी कॉर्नर मार्गावरून प्रवेश बंद केला आहे.

Kolhapur Ganesh Visarjan
ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

पोलिस बंदोबस्‍त असा..

पोलिस अधीक्षक

पोलिस उपअधिक्षक

पोलिस निरीक्षक

२७

१००

सहा. निरीक्षक/उपनिरीक्षक

७६६

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com