

Kolhapur Ganeshotsav
esakal
कोल्हापूर: आवाजाची मर्यादा पाळण्याचे बंधन असतानाही काही साउंड सिस्टीममध्ये ‘प्रेशर मिड’चा वापर करून कर्णकर्कश आवाज निर्माण केला जातो. लहान मुले, वृद्धांचा थरकाप उडविणाऱ्या अशा साउंड सिस्टीमवर कारवाई केली जाणार आहे. मिरवणुकीत महिला, मुलींचा सहभाग असल्याने स्मोकरद्वारे धूर केल्यास गैरप्रकार घडू शकतात. गतवर्षी अनेकांच्या डोळ्यांना घातक लेसरमुळे इजा झाल्याचेही समोर आल्याने स्मोकर, लेसर वापराला पूर्णपणे बंदी असेल, असा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला.