कोल्हापूर कन्येची एमपीएससी परीक्षेत बाजी 

kolhapur girl ashwini retare Number one in state in the NTB category in masc exam
kolhapur girl ashwini retare Number one in state in the NTB category in masc exam
Updated on

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) परीक्षेत सांगरूळ (ता. करवीर) येथील अश्‍विनी रामदास जाधव-डवरी यांनी एनटी ब प्रवर्गात मुलींत राज्यात पहिला क्रमांक मिळविला. त्यांचे वडील रामदास जाधव तांबट व्यवसाय करत असून, आई अलका शेतमजूर आहेत. विवाहानंतर अभ्यासात सातत्य राखत त्यांनी हे यश मिळविले.

अश्‍विनी मूळच्या रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा, जि. सांगली) येथील आहेत. त्यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या रेठरे हरणाक्ष विद्यालय, सातवीपर्यंत इस्लामपूरच्या पठ्ठे बापूराव हायस्कूल, दहावीपर्यंत महात्मा फुले विद्यालयात झाले. त्यांनी दहावीला 61.46 टक्के गुण मिळविले. मालती वसंतदादा पाटील महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळविली. त्यांचा इतिहास विषय होता. सांगरूळ येथील नवनाथ जगन्नाथ वाटकर यांच्याशी 2012 ला त्यांचा विवाह झाला. वाटकर यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासास सुरवात केली. मात्र, त्यानंतर अभ्यासात खंड पडला. मुलीच्या जन्मानंतर त्यांनी 2016 ला पुन्हा अभ्यासास सुरवात केली. दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. 

या यशाबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, "माझ्या यशात आई-वडील, पती नवनाथ, सासू जयश्री वाटकर यांचा वाटा मोलाचा आहे. त्यांच्या प्रोत्साहनाखेरीज मला यश मिळविता आले नसते. सात वर्षांची मुलगी अनुष्काचा सांभाळ करत अभ्यासाचे काटेकोर नियोजन केले होते.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com