Gokul Chairman Election Dispute in Kolhapur
esakal
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेला कायदेशीर पेच अद्याप कायम आहे. १४ संचालकांच्या आवश्यक कोरमअभावी गुरुवारी (ता. २९) अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेली विशेष सभा तहकूब करावी (Gokul chairman election dispute) लागली. महायुतीच्या १२ संचालकांनी गैरहजर राहून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रोखली. मात्र, या तांत्रिक पेचावर तोडगा काढण्यासाठी समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होणार आहे.