Hasan Mushrif clarifies Satej Patil's role in Navid Mushrif's name selection.
esakal
कोल्हापूर : नविद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष व्हावेत, म्हणून आमदार सतेज पाटील यांनी बंद पाकिटात नाव दिलेले नाही. तर, तो निर्णय मुख्यमंत्र्यांसमोर झाला होता, नाव सुचविण्याबाबत सतेज पाटील यांचा (Satej Patil role in Gokul chairman election) संबंध नव्हता, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, गोकुळ अध्यक्ष निवडीच्या पुढील बैठकीला महायुतीचे संचालक उपस्थित राहतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी नमूद केले.