
गोकुळ दूध संघात सत्ता महायुतीची विरोधात मोर्चा महायुतीचाच
esakal
Kolhapur Gokul Dairy : ‘गोकुळ’मध्ये महायुतीची सत्ता असली तरी आज झालेल्या आंदोलनात महायुतीतीलच घटक पक्ष परस्परांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र दिसले. डिबेंचर कपातीच्या निर्णयाविरोधात महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजपच्या शौमिका महाडिक यांनी काढलेल्या मोर्चामुळे सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद सार्वजनिक पातळीवर आले आहेत. यातून शेतकरी, दूध संस्थांना न्याय मिळालाच पाहिजे, यात दुमत नाही, त्यासाठी योग्य निर्णय अपेक्षित आहे.