Hasan Mushrif latest statement on Gokul election
esakal
Gokul election latest update : ‘गोकुळ’मध्ये शपथा घेण्यावर बोलणाऱ्यांनी यापूर्वी किती शपथा घेतल्यात, त्याची छायाचित्रे माझ्याकडे आहेत. आता बतावण्या बंद कराव्यात, वस्तुस्थितीला सामोरे जावे, रडत न बसता लढावं, असे आव्हान महायुतीच्या ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’चे प्रमुख मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिले. ‘गोकुळ’चा पुढचा अध्यक्ष मुख्यमंत्री ठरवतील, असेही त्यांनी जाहीर केले. महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी यापूर्वी शशिकांत पाटील यांना डावलून नविद मुश्रीफ यांना अध्यक्ष केल्याचीही कबुली त्यांनी दिली.