कोल्हापूर : बेरकळवाडीने डोंगराळ भागात फुलविले गोकुळ

गोकुळदूध संघाच्या सहाय्याने गावात दुग्ध क्रांती होत आहे.
 farmer a large income
farmer a large incomesakal

कोल्हापूर: जिल्ह्यातील सधन म्हणून ओळखले जाणारे करवीर तालुक्यातील बेरकळवाडी हे गाव तसं अडगळीचंच समजलं जातं. अवघी साडेसातशे लोकसंख्या असणाऱ्या गावात सहा दूध संस्था आहेत. या माध्यमातून आणि कोल्हापूर जिल्हा सहकारी (गोकुळ) दूध संघाच्या सहाय्याने गावात दुग्ध क्रांती होत आहे. पूर्वी प्रतिदिन ५० लिटर दूध संकलन असणारे हे गाव आता प्रतिदिन म्हशीचे ५७० लिटर दूध संकलन करत आहे.

गावातील प्रत्येक गोठ्यात एक जातिवंत म्हैस बांधलेली दिसते. पूर्वी गावाला पाण्याची व्यवस्था नव्हती. तरीही ग्रामस्थांनी न डगमगता पाझर तलाव, विहीर व बोरिंग पाण्याच्या साह्याने दुग्ध उत्पादनात भरारी घेतली आहे. त्यामुळे गावाचा आदर्श संपूर्ण जिल्ह्याने घ्यावा, अशी कामगिरी केली आहे. पूर्वी संपूर्ण गावचे दूध संकलन हे प्रतिदिन पन्नास लिटर इतकेच होत होते. दरम्यान, २०१७-१८ मध्ये गावांमध्ये हरियाणामधून मुऱ्हा जातीच्या म्हशी खरेदी केल्या. अतिशय दुर्गम व सोयीसुविधा नसणाऱ्या गावात लोकांनी हरियाणातून मुऱ्हा जातीच्या म्हशी खरेदी करण्याचे धाडस केले. भात शेती व वीटभट्टी व्यवसाय असतानाही गावातील लोकांनी व शेतकऱ्यांनी धाडसाने दुग्ध व्यवसायात पाय रोवले आहेत. याला गोकुळनेही मोठी साथ दिली आहे. याच्या जोरावर या गावातील मुऱ्हा म्हशी जिल्ह्याचे लक्ष वेधत आहेत. शेतकऱ्यांनी गोठ्यात ३९ रेड्या तयार केल्या आहेत. वासरू संगोपन योजनेमधून ३९ रेड्या तयार झाल्या आहेत. त्यापैकी आठ रेड्या गाभण आहेत. संगोपन व्यवस्थापन योग्य केल्याने प्रति एक जनावर सरासरी ११ ते १४ लिटर दूध उत्पन्न देते. प्रत्येक वेतातील दुधाची सरासरी २२ ते २४ लिटर दूध

मिळाले आहे.

दृष्टिक्षेपात

बेरकळवाडी कोल्हापूरपासून २३ किलोमीटर अंतर

लोकसंख्या ७५०

एकूण दूध संस्था ६

दूध संकलन ५७० लिटर प्रतिदिन

हरियाणातून आणलेल्या ४७ म्हशी तिसऱ्या

वेतात गाभण गेलेल्या आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com